क्राईम

खळबळजनक! पुतण्याचा चुलता-चुलतीवर धारदार शस्त्राने हल्ला: बीड तालुक्यातील घटना

लोकगर्जनान्यूज

बीड : वृध्द चुलता व चुलतीवर पुतण्याने धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना मुळुकवाडी येथे आज शनिवारी ( दि. २६ ) सकाळी ७ च्या सुमारास घडली. दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी असून उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथून सकाळी मनाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून नात्याने पुतण्या असलेल्या रोहिदास विठ्ठल निर्मळ याने चुलता बळीराम मसाजी निर्मळ ( वय ८० वर्ष ), चुलती केसरबाई बळिराम निर्मळ ( वय ७० वर्ष ) रा. मुळुकवाडी ( ता. बीड ) या दोघांवर कोयत्याने सपासप वार केले. दोघेही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गंभीर जखमींना ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना देताच एपीआय शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, लिंबागणेश चौकीचे डिडुळ, सचिन मुरुमकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पाहाणी करत आहेत. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजली आहे. परवाच वडवणी तालुक्यात चुलत्याने पुतण्याची हत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुतण्याने वृध्द असलेल्या चुलता – चुलतीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. रक्ताच्या नात्यापुढे शेती, द्वेष, मत्सर मोठा ठरतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »