खळबळजनक! नातवाने केला आजोबाचा खून
लोकगर्जनान्यूज
केज : मंदिराच्या बाहेर दबा धरून बसलेल्या नातवाने दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या आजोबावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना शहरातील सिध्दीविनायक गणेश मंदिराजवळ घडली आहे. आरोपी नातु स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली.
आज मंगळवार ( दि. ५ ) गिरधारी किसनलाल शिल्लक ( वय ६० वर्ष ) हे नेहमीप्रमाणे सकाळी कानडी रोडवरील सिध्दीविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन करुन ७:३० च्या सुमारास मंदिरातून बाहेर पडले. बाहेर येताच दबा धरून बसलेला रोहित रतन शिल्लक ( वय २५ वर्ष ) याने हातातील कोयत्याने डोक्यात,मानेवर असे सपासप वार केले. या हल्ल्यात डोक्याची कवटी व मानेच्या शिरा तुटून गिरधारी शिल्लक यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविले. हल्ला करणारा व मयत हे नात्याने चुलत नातु आणि आजोबा आहेत. सदरील घटना जमिनीच्या वादातून घडल्याची चर्चा सुरू असून खरे कारण पोलीस तपासात निष्पन्न होईल.