खळबळजनक! डॉक्टर मुलाकडून जन्मदात्याचा खून: बीड जिल्ह्यातील घटना
लोकगर्जनान्यूज
बीड : डॉक्टर असलेल्या मुलाने झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात कशानेतरी मारुन खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ माजली असून आईच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बीड शहरातील अंकुश नगर येथे सुरेश काशिनाथ कुलकर्णी हे वास्तव्यास आहेत. यांचा मुलगा सुधीर कुलकर्णी हा बीएएमएस ( Bams ) झालेला आहे. यापुढे तो एमडी ( MD ) ची तयारी करत आहे. परंतु तीन वर्ष झाले तरी यश येत नसल्याने तो नैराश्यात होता असे बोलले जात आहे. मंगळवारी रात्री याच डॉक्टर मुलाने मध्यरात्री झोपत असलेले वडील सुरेश काशिनाथ कुलकर्णी ( वय ७० वर्ष ) रा.अंकुश नगर, बीड यांच्या डोक्यात मारुन खून केला. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मुलाची आई सुरेखा कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा सुधीर कुलकर्णी याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. डॉक्टर असलेल्या मुलानेच जन्मदात्याचा खून केल्याची बातमी समजताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस तपास करत असून, या तपासातून कारण समोर येईल.