आपला जिल्हा
खळबळजनक! घरात स्फोट तरुण ठार
लोकगर्जनान्यूज
बीड : घरात मोठा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ( दि. 20 ) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हा स्फोट नेमका कशाचा हे अद्याप समजू शकलेले नाही.
प्रसाद विकास डावकर ( वय 18 वर्ष ) रा. सर्कस ग्राउंड,बीड असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या घरात बेडरुममध्ये असताना अचानक मोठा स्फोट झाला. यामुळे प्रसाद याचा जागीच मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण आहे की, बेडरुम जळून गेले असून घरालाही तडे गेले आहेत.