क्राईम

खळबळजनक! केज मध्ये तरुणाचा खून

लोकगर्जनान्यूज

केज : शहरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून केल्याची घटना काही वेळापूर्वी क्रांती नगर भागात घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, आरोपीचे नाव अद्याप समोर आले नाही. परंतु मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करावी म्हणून केज पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी शांतता राखण्याचे आवाहन करत आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

गोरख महाविर हजारे रा. क्रांती नगर ( केज ) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात काहीजणांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. गोरख हजारेवर हल्ला करणारा संशयित आरोपी फरार झाला. घटनेची माहिती केज शहरात वाऱ्यासारखी पसरली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दवाखाना येथे भेट देऊन जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. आरोपीला अटक करुन कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. फरार आरोपीचा शोध पोलीसांनी सुरू केला. मयताचे नातेवाईक गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करावी म्हणून ठाण्यात बसून आहेत. या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस तपासात निष्पन्न होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »