खळबळजनक! केज तालुक्यात नर्तिकेचा खून
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या एका कला केंद्रातील नर्तिकेला लॉजवर नेऊन तिचे नाक, तोंड दाबून व गळ्यावर वार करुन खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली. या प्रकरणी मयेतेच्या आईच्या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अडीच महिन्यांनंतर या घटनेला वाचा फुटली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केज-मांजरसुंबा रस्त्यावरील एका कला केंद्रात एक महिला आई व मुलासह राहून येथे बारीमध्ये नृत्य करुन आपलं गुजरान करत होती. या दरम्यान सदरील नर्तिकेची हिंगोली जिल्ह्यातील एका इस्माची ओळख झाली. नियमित येण्याने जवळीक वाढत गेली. तो कधीही आला की, सदरील नर्तिकेला एका लॉजवर घेऊन जात असे. खून झाला त्या दिवशी तो आला आणि नर्तिकेला चार चाकी गाडीत लॉजवर घेऊन गेला. परंतु सकाळी ती नर्तिका न आल्याने आईची चिंता वाढली व ती एका महिलेचा सोबत घेऊन सदरील लॉजवर गेली व दुसऱ्या मजल्यावर जाऊन खोलीत पाहिले असा मुलगी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर वार करण्यात आल्याचं दिसून आले. लॉजच्या मॅनेजर ( व्यवस्थापक ) चौकशी केली असता सोबत आलेला तो इसम पळून गेल्याचे सांगितले. तसेच यावेळी पोलीसात तक्रार देऊ नको म्हणून धमकी देऊन सदरील नर्तिकेचा मृतदेह तिच्या मुळगावी नेऊन अंत्यविधी केला व पुरावा नष्ट केला. परंतु जवळपास अडीच महिन्यांनंतर मयेतेच्या आईने हिंमत करुन एएसपी पंकज कुमावत यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार सांगितला त्यांनतर पोलीसांनी फिर्याद घेऊन आरोपी गजानन उर्फ गज्जु शिवराम कराळे रा. डिग्रस ( जि. हिंगोली ), ढाकणे रामनाथ रा. सारुळ ( ता. केज ), वसुदेव सारुक रा. जोला ( ता. केज ), शमीम भाभी ( परभणी ), राठोड ( मॅनेजर लॉज ) रा. वसमत ( जि. हिंगोली ), घुगे ( परभणी ) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत.