खळबळजनक! कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला
लोकगर्जनान्यूज
आष्टी : तालुक्यातील धानोरा येथे बांधकाम सुरू असलेल्या घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत आज गुरुवारी ( दि. ४ ) मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने पोलीसांनी कोणी महिला हरवली असेलतर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा येथे पिंपरखेड रस्त्यावर एका घराचे बांधकाम सुरू असून, अर्धवट काम झाले आहे. याच ठिकाणी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती पोलीसांना देताच सपोनि मंगेश साळवे, पोउपनि देविदास सातव, अंमलदार सुदाम पोकळे, सतीश पैठणे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. अंदाजे आठ दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज असून त्यामुळे मृतदेह कुजुन गेला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. याप्रकरणी परिसरातील, इतर ठीकाणची महिला हरवली असेलतर पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले.