खळबळजनक! आंतरजातीय विवाह केलेल्या पती-पत्नी दोघांचे शेतात मृतदेह आढळले
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली असून, सकाळी शेतात गेलेले दांपत्याचे वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. सदरील प्रकार आत्महत्येचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. परंतु आत्महत्या का केली? असावी हे कारण समजलं नाही. या दाम्पत्याचा आंतरजातीय विवाह झालेला आहे.
ईश्वर गुंड व ऋतुजा गुंड रा. वाघळूज असे मयत पती-पत्नीची नावं आहेत. ते शेतात कामासाठी गेलेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न पोचल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता ईश्वर गुंड यांचा मृतदेह रात्रीच शेतात आढळून आला. सकाळी मयताची पत्नीचाही शेतात मृतदेह आढळून आला. या दोघांचा आंतरजातीय विवाह झालेला असून त्यांना एक मुलगाही असल्याचे कळते. पोलीसांच्या माहिती नुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज आहे. परंतु आत्महत्या का केली? हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवले आहे. पोलीस तपासात यामागील नेमकं कारण समोर येईल. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.