प्रादेशिक

खळबळजनक! अख्खं घरचं जमिनीने गिळून टाकले

७० ते १०० फूट खाली घुसले घर:प्रशासनाची घटनास्थळी धाव

लोकगर्जना न्यूज

अख्खं घरचं जमिनीने गिळून टाकले म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु ही घटना खरी असून चंद्रपूर जवळील घुग्गुस येथे ही घटना शुक्रवारी ( दि. २६ ) दुपारी घडली आहे. अख्खं घरचं ७० ते १०० फूट खोल जमिनीत घुसले आहे. या घटनेने येथे खळबळ माजली असून येथे कोळशाची भूमिगत खान होती त्यामुळे भूस्खलन होऊन ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासनाने धाव घेतली आहे.

गजानन मडावी असे त्या घर मालकाचे नाव आहे. शुक्रवारी ( दि. २६ ) दुपारी अचानक घर हलत असल्याचे लक्षात आले. भूकंप आला म्हणून सर्वजण घराच्या बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आरडाओरडा ऐकून काही लोकं घटनास्थळी जमा झाले. घर जमिनीत घुसत असल्याचे लक्षात आले. काही क्षणातच भूस्खलन होऊन तब्बल ७० ते १०० फूट खड्डा पडून अख्खं घरचं जमिनीने गिळून टाकले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. भूस्खलन झाल्याने या भागातील विजपुरवठा बंद करण्यात आला. तसेच परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तर गजानन मडावी यांच्या रहाण्याची व्यवस्था नगर पालिकेच्या वतीने करण्यात आली. येथे काही वर्षांपूर्वी भुमिगत कोळसा खाण होती. भुयारी पद्धतीने खोदकाम करून कोळसा काढण्यात येत असे. त्यानंतर भुयारात वाळू भरण्यात येत असे. परंतु येथे वाळू भरण्यात न आल्याने हा भाग मोकळाच राहिला व त्यामुळे भूस्खलन होऊन हे घर जमिनीत गायब झाले. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेने अमराई वार्ड परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथून सुरक्षित स्थळी हलवून पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »