कोष दर प्रति किलो ८००रेशीम उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण

आडस येथील शेतकऱ्यांना मिळाला भाव
आडस / प्रतिनिधी
रेशीम कोषच्या दरात उंचाकी दरवाढ मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात. बुधवारी ( दि. १५ ) आडस ( ता. केज ) परिसरातील शेतकरी कोष विक्रीसाठी रामनगर ( कर्नाटक ) येथे गेले आहेत. त्यांना प्रति किलो ७९८, ७८८ असा दर मिळाला आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ऊस लागवड करावीतर पाणी नाही. कापूस लावावं तर उतार नाही. या परिस्थितीला कंटाळून आडस परिसरातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळला आहे. मेहन जास्त असलीतरी शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून तुतीकडे पाहिले जात आहे. यासाठी आपल्याकडील वातावरण पोषक असल्याने बीड जिल्ह्यातील रेशीम कोष दर्जेदार असतो त्यामुळे येथील कोषला चांगलाच दर मिळतो. ५०० ते ६०० रु. प्रति किलो असे कोषचे स्थिर भाव असतो. परंतु मागील एक महिन्यापासून कोष दरात चांगलीच वाढ झाली. महिना झाला कर्नाटक राज्यातील रामनगर येथे हे दर ७०० रु. किलो प्रमाणे स्थिर आहे. सोमवारी ( दि. १३ ) आडस, कळमअंबा, लाडेवडगाव, जवळबन येथील रेशीम उत्पादक शेतकरी रामनगर येथे कोष विक्रीसाठी घेऊन गेले आहेत. त्यांचा माल बुधवारी ( दि. १५ ) विकला गेला. प्रत्येकाचा कोष हा ७०० पार गेला असून या गटातील विठ्ठल शेंडगे ,आडस ७८८ ,अमृत लाड लाडेवडगाव ७९८, दत्त अंगद अर्जुन कळमअंबा ७५०, प्रकाश गायकवाड जवळबन ७८८ प्रति किलो हा उच्चांकी दर मिळाला. हे दर पहाता आजपर्यंत कधीच असा दर मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली असून मेहनतीचं चीज झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. उच्चांकी दर मिळाल्याने शेख मुसा, विशाल राऊत यासह आदी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.