कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह कृषीमंत्री धनंजय मुंडे कॉरंनटाईन
लोकगर्जनान्यूज
मागील काही दिवसांपासून कोरोनाने डोकं वर काढलं असून जेएन १( JN 1 ) व्हेरियंटची चर्चा जोरदार सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने पुणे येथील घरीच ते कॉरंनटाईन असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना मागील चार दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यात देशभरात कोरोनाचा नवीन व्हेरियंटची जे एन १ ( JN 1 ) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या धास्तीने कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती पहाता मुंडेंची कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या ते पुणे येथील घरी कॉरंनटाईन आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. राज्यात मागील २४ तासात एकूण ३५ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. यापुर्वीही धनंजय मुंडे यांना कोरोयोनाची दोनवेळा लागण झाली आताही तिसरी वेळ आहे. याबाबत काही वेळापूर्वी स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल…
सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.