आपला जिल्हा
कोरोना अपडेट; काल दिलासा आज वाढ
बीड
काल मंगळवारी ( दि. २१ ) जिल्ह्यात केवळ परळी तालुक्यातील १ बाधित रुग्ण आढळून आल्याने मोठा दिलासा मिळाला. परंतु आज बुधवारी प्राप्त १३९२ अहवालात जिल्ह्यात ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे जनतेने सजग रहाण्याची गरज आहे. १३८३ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई २, आष्टी २,बीड १, केज १, माजलगाव १, शिरुर २ असे तालुकानिहाय जिल्ह्यात ९ बाधित रुग्ण आढळले आहेत.