आपला जिल्हा
कोरोना अपडेट; आज जिल्ह्यात किंचित वाढ
अंबाजोगाई ५, गेवराई २,केज १, माजलगाव १, परळी ४
बीड
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असून आज प्राप्त अहवालात जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये किंचित वाढ झालेली आहे. एकूण ९८८ संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील ९७५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असून, १३ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यातील ५ रुग्ण अंबाजोगाई, २ गेवराई, १ केज, १ माजलगाव, ४ परळी असे पाच तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले तर, ६ तालुके निरंक आहेत.