कोरोनाची टेस्ट कोणासाठी? नवीन नियमावली जाहीर!
लोकगर्जना न्यूज
देशात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून तिसरी लाट आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर ) कडून कोरोना टेस्टींग बाबतीत नवीन गाइड लाइन जाहीर करण्यात आली. त्यामध्ये संपर्कातील कोणाची टेस्ट करावी, कोणाची नाही. तसेच कोणासाठी कोरोना टेस्ट बंधन कारक आहे हे स्पष्ट केले आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रवेशानंतर देशात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. प्रत्येक राज्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून तिसरी लाट धडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढते बाधित रुग्ण पहाता टेस्टींग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट या तिन्हीचा आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर ताण पडतो. बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला शोधून टेस्ट करणे सोपे काम नाही. परंतु आयसीएमआरने टेस्टींगचे निकष बदलून मोठा दिलासा दिला. कोरोना बाधिताच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्ती जसे वृद्ध, गंभीर आजार असलेली व्यक्तींची टेस्ट आवश्यक आहे. प्रत्येकाच्या टेस्टींगची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ज्यांना सर्दी,ताप, खोकला, गंध येत नसेल, जिभेला चव नसेल अशा व्यक्तींसाठी तसेच विदेशातून आलेल्या, विदेशात जाणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना टेस्ट बंधन कारक आहे.