केवायसीचा बहाना करून बीडच्या महिला डॉक्टरच्या खात्यातील १ लाख गायब
बीड : केवायसी करा असा म्हणून आलेल्या मेसेज लिंकवर क्लिक केले. आलेला ओटीपी देताच बँक खात्यातुन १ लाख रुपये डेबीट झाल्याचा प्रकार घडला . याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलीसात गुन्हा दाखल झाला .
शहरातील पेठ बीड हद्दीतील एका महिला डॉक्टरला अनोन क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली . लिंक ओपन करताच केवायसी अपडेट करा असा मेसेज आला . केवायसी अपडेट करताना आलेला ओटीपी समोरील व्यक्तीच्या मोबाईलवर शेअर केला . त्यानंतर काही क्षणात महिला डॉक्टरच्या खात्यातुन १ लाख रूपये डेबीट झाले . पैसे काढून घेताच त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच थेट पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी महिला डॉक्टरांनी फिर्याद दिली. त्यावरून पेठ बीड पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.पो.नि. केदार पालवे करीत आहेत .