राजकारण

केज शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुक ठरली चुरशीची: संचालक संख्या झाली 50-50

शिक्षक विकास पॅनलचे ८ तर पतसंस्था बचाव पॅनलचे ७ उमेदवार विजयी

लोकगर्जनान्यूज

केज : येथील शिक्षक पत संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे निकाल हाती आले.यामध्ये शिक्षक विकास पॅनलचे ८ उमेदवार तर शिक्षक पतसंस्था बचाव पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक चूरशीची ठरली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

आज रविवारी ( दि. ५ ) केज येथील शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक शिक्षक विकास पॅनल आणि शिक्षक पतसंस्था बचाव या दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. शिक्षक विकास पॅनलचे पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर शिक्षक पतसंस्था बचाच पॅनलचे दहा उमेदवार निवडणूक लढवित होते आणि एक अपक्ष असे मिळवून दोन्ही पॅनल व एक अपक्ष मिळून एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज पार पडलेल्या निवडणुकीत ५५१ मतदारांपैकी५३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वसाधारण जागेवर शिक्षक विकास पॅनलचे बळीराम विक्रमराव थोरात (३३९), अनिल येडबा ठोंबरे (३१७), किरण जगन्नाथ जगदाळे (३०७), श्रीराम गोकुळराव देशमुख (३०७), संतोष बिभीषण मोराळे (२९०) बाळासाहेब यशवंत जोगदंड (२८४) आणि शिक्षक पतसंस्था बचाव पॅनलचे विजयकुमार महादेव आंधळे (३०१), किशोर भारत भालेराव (२९९), संजय शहाजीराव गलांडे (२९७) अनिल मधुकर कोरडे (२८४)निवडुन आले तर अनुसूचित जाती जमातीच्या राखीव प्रवर्गातून पतसंस्था बचाव पॅनलचे अंबादास नानाभाऊ काळे (२९०) हे निवडून आले आहेत. महिला राखीव प्रवर्गातून पतसंस्था बचाव पॅनलच्या हिराबाई लक्ष्मण शेळके (३२१) आणि शिक्षक विकास पॅनलच्या स्वाती पंढरीनाथ शेप (२८०) या निवडून आल्या. इतर मागासवर्गीय राखीव जागेवर पतसंस्था बचाव पॅनलचे कल्याण शिवाजीराव काळे (२९४) आणि विशेष मागास प्रवर्गासाठीच्या राखीव प्रवर्गातून शिक्षक विकास पॅनलचे बाळासाहेब काशिनाथ अंकुशे (२८०) हे निवडून आले आहेत.
या निवडणुकीत ९६.७३% मतदान झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आर. एम. मोटे यांनी काम पाहिले. निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »