केज रोटरी क्लब आयोजित डान्स स्पर्धेत कु. गार्गी गवळी प्रथम तर इशा गायकवाड द्वितीय

केज: महाराष्ट्रदिनी रोटरी क्लब ऑफ केज कडून आयोजित केलेल्या खुल्या नृत्य स्पर्धेत कु. गार्गी गवळी हिने प्रथम तर इशा गायकवाडने दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तृतीय क्रमांक कु. श्रावणी जाधव तर, प्रोत्साहनपर बक्षिसे कु. अर्पिता चिद्रवार व अभिषेक जाधवर यांना मिळाला.
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षी रोटरी केज शहरातील बाल व युवा कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या डान्स स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी केज रोटरीने केजचे भूमिपुत्र शाहीर तुकाराम ठोंबरे( तांबवा) यांच्या पथकाचा सामाजिक जागृतीवर आधारित कार्यक्रम पहिल्या सत्रात घेऊन दुसऱ्या सत्रात डान्स स्पर्धा घेण्यात आली. केज शहरातील हनुमान मंदिर प्रांगणात पार पडलेल्या या डान्स स्पर्धेत एकूण 21 कलाकारांनी सहभाग नोंदवून सुंदर नृत्य सादर केले. रोटरी अध्यक्ष रो बापूराव सिंगण, सचिव रो अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष रो हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन रो सूर्यकांत चवरे, रो श्रीराम देशमुख, को-चेअमन रो अरुण नगरे व रो श्रीराम शेटे यांनी कलाकारांचे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून केज रोटरीचे सदस्य रो प्रा डॉ बी जे हिरवे, रो प्रा डॉ सी एन सोळुंके व रो दादा जमाले पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी
रो पशुपतीनाथ दांगट (प्रेसिडेंट इलेक्ट), रो विकास मिरगणे, रो. प्रवीण देशपांडे, रो डॉ संतोष जोशी, रो महेश जाजू, रो विजय जॅकेटीया, रो सीता बनसोड, रो डी एस साखरे, रो दादा जमाले, रो दत्ता हंडीबाग, रो धनराज पुरी, रो प्रकाश कामाजी, रो अनंत तरकसबंद, रो हारूनभाई इनामदार, रो डॉ दिनकर राऊत, रो राहुल सोनवणे, रो सूचित शेटे, रो सत्यवान राऊत, रो संतोष पिलाजी, रो हनुमंत बोर्डे, रो भीमराव लोखंडे, रो बापूराव वाळके, रो संजय डांगे इत्यादींनी विशेष परीश्रम घेतले.