केज येथे 200 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप
लोकगर्जनान्यूज
केज : शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात शनिवार रोजी गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.
सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया आणि अटलास कॉपको इंडिया प्रा. ली या कंपनीच्या सहयोगाने
क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठाण केज यांच्या सहकार्याने केज तालुक्यातील गरीब गरजू मुली ज्या रोज शाळेत ३ ते ४ किलोमीटर पायी चालत जातात त्यांना २०० सायकलीचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला श्री दादासाहेब शेळके पाटील सीनियर सोशल इंजिनियर ॲटलास कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी एफ टी आय या संस्थेचे विश्वस्त सिद्धेश बागवे आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती पोलिस अधिकारी कविता नेरकर, मोहन गुंड, प्रा कापसे , अशोक रोडे, डॉ हनुमंत सौदागर, शिशिकांत इंगळे, शत्रुघ्न तपसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत देशपांडे, अमोल शिनगारे इतर, कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठाणचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले, या वेळी विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेळके म्हणाले की यापुढेही महाराष्ट्रात गरजूवंत अनेक विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत आहोत क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान आमच्या समवेत कार्य करत आहे यामुळे हे कार्य करणे शक्य होत आहे.
गरजू मुलींना सायकल मिळाल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद जाणवत होता सावित्रीच्या लेकी अतिशय खुश होऊन मदत केल्या सायकल दिलेल्या संस्थेच्या व क्रांतिसिंह नाना पाटील आयोजकाना धन्यवाद देत असतानाचे दिसून आले.
सामाजिक कार्यासाठी आम्ही सक्रिय काम करणार
गोरगरीब उपेक्षित समाजासाठी कायम काम करत राहून त्यांना आधार देण्यासाठी आम्ही सक्रिय राहून काम करणार
सिद्धेश बागवे
सी एफ टी आय या संस्थेचे विश्वस्त
मदतीला धावून आले
आमच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलीची अत्यंत आवश्यकता होती सी एफ टी आय व क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान यांनी सायकल देऊन आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले आहे
पालक भगवान जोगदंड
आनंदगाव