केज येथे व्यापाऱ्यांचा मोर्चा! उद्या बैठकीत ठरणार रणनिती

लोकगर्जनान्यूज
केज : प्रशासनाने येथील अतिक्रमणे उठवली असून यामुळे हातावर पोट असलेल्या छोट्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली. या व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले. यासाठी उद्या मंगळवारी बैठकीत रणनिती ठरणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले.
केज येथे फलोत्पादन विभागाची बसस्थानका समोर मोठी मोकळी जागा आहे. यामुळे येथे छोट्या व्यवसायिकांनी पत्र्याच्या शेडमध्ये आपले व्यवसाय उभारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. परंतु प्रशासनाने या अतिक्रमणावर ( दि. १६ ) हातोडा मारुन उठवलं आहे. यामुळे शेकडो व्यापाऱ्यांचा रोजगार गेला आहे. यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यांना जागा देऊन रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु केज नगरपंचायतकडे पुरेशी जागा नाही. रस्त्यालगत केवळ प्रशासकीय कार्यालयांची जागा आहे. या जागा कायद्याच्या चौकटीत व्यापाऱ्यांना बांधा,वापरा व हस्तांतरित करा. या धर्तीवर भाडे तत्वावर द्यावीत अशी केज विकास संघर्ष समितीची मागणी आहे. अतिक्रमण उठताच निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने याकडे अद्याप लक्ष दिले नाही. जर या जागा व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर मिळाल्यातर नगर पंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या गोगरीबांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल म्हणून या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले. यासाठी उद्या मंगळवारी ( दि. २७ ) येथील विश्रामगृहात बैठक आयोजित केली. या बैठकीला केज येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. हनुमंत भोसले यांनी केले आहे.