केज-मांजरसुंबा रस्त्यावर एसटी व पिकअपचा भीषण अपघात
लोकगर्जना न्यूज
केज : राज्य परिवहन महामंडळाची बस व पिकअपची धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात काही वेळापुर्वी केज-मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोग येथील पेट्रोल पंप जवळ घडला आहे.
आदिनाथ मच्छिंद्र घोळवे रा. मुंडे वाडी ,बाबु शंकर ठोंबरे रा. दहिफळ असे जखमींची नावं असून ते पिकअप मध्ये होते. मुंबई-धारूर या राज्य परिवहन महामंडळाची बस आणि पिकअपची धडक झाली. यामध्ये पिकअप मधील दोघं जखमी झाले. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करुन खाजगी रुग्णवाहिकेतून जखमींना केज उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. बस रस्त्याच्या खाली उतरली असून त्यातील प्रवासी जखमी असतील परंतु त्याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. केज-मांजरसुंबा रस्त्यावर नित्याचेच अपघात झाले असल्याचे या रस्त्याचे दुसरं नांव म्हणजे अपघात महामार्ग झाल्याचे बोलले जात आहे.