राजकारण

केज मतदारसंघात नमिता मुंदडा यांचेच पारडे जड

लोकगर्जनान्यूज

केज : मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा यांनी केलेली विकासकामे अन् याची मतदारांना असलेली जाणीव तसेच नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि आ. पंकजा मुंडे, माजी खा. प्रितम मुंडे यांचे पाठीशी असलेले बळ पहाता नमिता मुंदडा यांचेच केज मतदारसंघात पारडे जड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान आहे. आता प्रचारासाठी चार दिवस उमेदवारांच्या हातात आहेत. काही दिवसांवर मतदान आलं आहे तरीही केज मतदारसंघात आ. नमिता मुंदडा यांच्या विरोधकांना अद्यापही प्रचाराचा सुरू गवसलाच नाही. तसेच मागील अडीच वर्ष सत्ता असूनही या काळात मतदारसंघात एकही काम करता आलेल नाही. काही सांगण्यासाठी नसल्याने फक्त आरोप आणि टीक सुरू असून मतदार याला कंटाळलेले दिसत आहेत. त्या तुलनेत आ. नमिता मुंदडा यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. मतदारसंघाती जवळपास गावात निधी पोहोचविला आहे. यामुळे नमिता मुंदडा यांना काय केले? हे सांगण्याची गरज भासत नसून त्यांची कामे किती झाली याची माहिती मतदार देत आहेत. या विकास कामामुळे त्यांची वेगळीच छाप मतदारसंघात पडली आहे. तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आ. पंकजा मुंडे, माजी खा. डॉ. प्रितम मुंडे यांचे पाठबळ असल्याने सुरवातीपासून मुंदडा यांचे पारडे जड आहे. तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, युवा नेतृत्व अक्षय मुंदडा यांचा दांडगा जनसंपर्क आणि नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा पहाता केज मतदारसंघात ओन्ली मुंदडा असेच वातावरण तयार झाले आहे. यामुळे त्यांचा विजय जवळ दिसत आहे. तर प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असतानाही केज मतदारसंघात मुंदडा विरोधकांना सुर गवसलेला दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »