केज नगर पंचायत निवडणूक रिंगणातून २१ जणांची माघार
केज : येथील नगर पंचायतीच्या प्रभाग क्र १, २, ८ आणि १२ या चार प्रभागांची निवडणूक होत आहे. यासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारां पैकी २१ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले असून चित्र स्पष्ट झाल्याने निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हे दिसत आहेत.
यासाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आज सोमवार ( दि. १० ) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिवस असल्याने प्रभाग क्र. १ मधून श्रीकिशन सुभाष कोल्हे, ज्योती लक्ष्मण जाधव, सय्यद नुरजहाँ अखील या तीन उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतले. प्रभाग क्र. २ मधून पार्वती विठ्ठलराव कराड, सुमेधा प्रविणकुमार शेप, सुवर्णमाला लिंबराज सोनवणे या तिघांनी तर, प्रभाग क्र. ८ मधून इनामदार तब्बसुम खैय्यसर, इनामदार निख्खत अब्दुलखुद्दुस, इनामदार शबाना अफसर, इनामदार फौजीया बेगम फसियोद्दिन, इनामदार नगमाबेगम कबीरोद्दीन, इनामदार सायराबेगम दलील, इनामदार नुसरतबेगम अमिरोद्दिन, इनामदार समीना मुजीब आणि इनामदार नूरजहाँ जहुरोद्दिन या नऊ तसेच प्रभाग क्र. १२ मधील खुरेशी अब्दुल खदीर खाजामिया, रामेश्वर दत्तात्रय राऊत, तेजश्री सोमनाथ गुंड, खतीब फैसल मुजफ्फर, इनामदार जलालोद्दिन मुन्नुमिया आणि इनामदार कमालोद्दीन मुन्नूमीया या सहा असे एकूण २१ उमेदवारांनी माघार घेतली.