क्राईम
केज तालुक्यात हृदयद्रावक घटना! असं कोणा सोबतही घडू नये
लोकगर्जनान्यूज
केज : शेततलावात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना दुपारी सावळेश्वर पैठण ( ता. केज ) येथे घडली आहे. या घटनेने केज तालुका सुन्न झाला असून घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
स्वराज जयराम चौधरी, श्लोक गणेश चौधरी, पार्थ श्रीराम चौधरी असे तीन मयत बालकांची नाव आहेत. हे तिघेही शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सदरील घटना आज मंगळवारी ( दि. 21 ) दुपारी घडली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून, केज तालुका सुन्न झाला. अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सदरील घटना नेमकी कशी घडली, मुले शेततळ्याजवळ कशी गेली याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.