क्राईम
केज तालुक्यात विद्यार्थीनीची आत्महत्या

केज : इयत्ता १० वीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. आत्महत्येच कारण अद्याप समजले नाही.
कु. प्रणिता निळकंठ चौरे ( वय १६ वर्ष ) रा. जिवाचीवाडी ता. केज असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आज मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास प्रणिताने घराच्या स्लॅबच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतीत केज पोलीसांना माहिती मिळताच पोलीस नाईक उमेश अघाव यांनी धाव घेत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.