क्राईम
केज तालुक्यात मृतदेह आढळला; आत्महत्या की, घातपात? पोलीसांचा शोध सुरू
केज : तालुक्यातील मस्साजोग येथील शिवारात गळफास असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार आत्महत्येचा की, घातपाताचा याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून पोलीस शोध घेत आहेत.
दत्तात्रय लक्ष्मण गायकवाड ( रा. मस्साजोग ) असे मयताचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आंबे शेत शिवारातील एका झडाला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह काही शेतकऱ्यांना दिसून आलं. याची माहिती पोलीसांना देताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.