क्राईम
केज तालुक्यात दोन वृध्दांची आत्महत्या
केज : तालुक्यातील आडस व शिंदी येथील वृध्दांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. आडस येथील वृद्धाने शनिवारी तर शिंदी येथील आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसात तालुक्यात दोघांनी आत्महत्या केली असून, या मागील कारण समजू शकले नाही.
शिवाजी रामभाऊ निंगुळे ( वय ६७ वर्ष ) रा. आडस ता. केज यांनी शनिवारी ( दि. १९ ) सकाळी ७ वाजण्याच्या आगोदर स्वतः च्या शेतात बांधावरील झाडाला गमछा ने गळफास लावून आत्महत्या केली. दुसरी घटना शिंदी ( ता. केज ) विष्णू कडीराम पारवे ( वय ६० वर्ष ) यांनी स्वतः च्या रहात्या घरी पत्र्याच्या अडूला गळफास लावून आत्महत्या केली. दोन दिवसात दोन वृद्धांनी आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवल्याचे समोर येताच हळहळ व्यक्त केली जात आहे.