भवताली

केज तालुक्यात खळबळ! महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन वर्षांपासून वीज जोडणी करून देत नसल्याने महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराला कंटाळून आज टोकाचे पाऊल उचलत चक्क केज येथील वीज कंपनीच्या कार्यालयात पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कार्यालयात एकच धावपळ उडाली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी धनराज सदाशिव घुले ( वय ३५ वर्ष ) यांनी शेतीसाठी वीज जोडणी करावी म्हणून केज येथील महावितरण कार्यालयात रितसर अर्ज केला. यानंतर कोटेशनही भरलं याला दोन वर्ष झाली असल्याचे सांगितले. तरीही दोन वर्षांपासून वीज जोडून दिली नाही. यामुळे वैतागून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कार्यालयात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
सुरक्षारक्षक ( security guard ) यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
शेतकरी धनराज घुले यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताच सेवेवर असलेल्या सुरक्षारक्षक ( security guard ) यांनी प्रसंगावधान राखून शेतकऱ्यास पकडले यामुळे पुढील अनर्थ टळल्याची चर्चा महावितरण कार्यालय परिसरात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »