क्राईम

केज तालुक्यात किराणा दुकान फोडून चोरट्यांनी केला पाऊण लाखाचा ऐवज लंपास

 

केज : देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याने घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तांबवा येथे रात्री किराणा दुकानाचे शटर उचकटून आत घुसून कपाटातील दागिने आणि रोख रकमेसह सुमारे पाऊण लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली.

केज तालुक्यातील तांबवा येथील शेषेराव गोवर्धन कराड हे पत्नी, मुलगा व मुलीसह पुर्ण कुटुंब ( दि.२९ ) जानेवारी घराला व दुकानाला कुलूप लावून त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनाला गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी ( दि. १ ) फेब्रुवारी रोजी रात्री शेषेराव कराड यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरटे आत घुसले, दुकानातील लोखंडी कपाट उघडून त्यातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे गंठन, तीन अंगठ्या व नगदी आठ हजार रु. असा एकूण ७३ हजार ५०० रु चा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शेषेराव कराड यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गु.र.नं. २९/२०२२ भा.दं.वि. ४५४, ४५७ आणि ३८० नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत. पोलीस घटना स्थळावर ठसे तज्ज्ञाला पाचारण करून गुन्ह्याचा तपास घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »