केज तालुक्यात अवकाळी पावसाने ‘या’भागाती रब्बी पिकांचे मोठे नुकसान
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील कोल्हेवाडी परिसराला रात्री झोडपून काढले असून, ज्वारी जमिनदोस्त झाली. तसेच इतरही रब्बी पिकांचे व कापसाचे मोठे नुकसान झाले.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे उष्णता वाढली आहे. अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असून, बुधवारी ( दि. १४ ) रात्री १०:३० ते १ वाजेपर्यंत केज तालुक्यातील कोल्हेवाडी व परिसरातील पावसाने जोरदार हजेरी लावली. सुसाट वारा असल्याने ज्वारीचे पीक पुर्णपणे जमिनदोस्त झाले. तसेच हरभरा, गहू सह आदि पिकांचे नुकसान झाले. कापूस वेचणीला आलेला असून अवकाळी पावसामुळे त्याचेही नुकसान झाले. खरीपही परतीच्या सततच्या पावसाने गेले त्या नुकसान भरपाईची शेतकरी वाट पाहत आहेत. हे झालेलं नुकसान रब्बी हंगामात भरुन निघेल अशी आशा आहे. परंतु यावरही अवकाळीचे संकट आल्याने संकटं शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही असे दिसून येत आहे. याबाबत तलाठ्यांना माहिती दिल्याचे चंदु मिसाळ यांनी सांगितले आहे.