केज तालुक्यातील संध्या थोरात वर्ग २ अधिकारी झाल्याने नागरी सत्कार
अभ्यासातून यशाची वाट सापडेल - डॉ हनुमंत सौदागर
लोकगर्जनान्यूज
केज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी कष्ट करण्याची हिम्मत आहे या जोरावर गुणवत्ता मिळवून विद्यार्थी यश मिळवू शकतात प्रयत्नाने यश मिळतेच.अभ्यासातून यशाची वाट सापडेल असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.ते तालुक्यातील कुंबेफळ येथील
संध्या व्यंकटराव थोरात यांनी सहाय्यक सहकारी अधिकारी वर्ग २ या पदावर निवड झाली.या यशाबद्दल ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने आई वाडीलांसह संध्या थोरात चा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रतनराव थोरात,प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर, प्रमुख उपस्थिती बालासाहेब थोरात,ग्रामपंचायत चे सरपंच अविनाश पांचाळ,सुरेश थोरात, प्रकाश थोरात श्रीकृष्ण थोरात,सिद्धिविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डिसले ,जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड उपसरपंच पती विष्णू थोरात,ग्रामसेवक श्रीमती भोसले,संदीप थोरात आदींची होती.
उपस्थित गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. संध्या थोरात यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश मिळवले याबाबतचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना संध्या म्हणाल्या ,मी याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले.कधीही परिस्थितीचे पांघरून घेतले नाही. कायम अभ्यास करून ध्येयाच्या दिशेने पुढे गेले. या यशामध्ये आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे असे मत व्यक्त केले. पुढे बोलतांना डॉ सौदागर म्हणाले ग्रामीण भागात गुणवत्ता आहे प्रयत आणि जिद्द ठेवल्यास यश प्राप्ती होते. स्वतःच्या मनात न्यूनगंड बाजूला ठेवून दिशा ठरवून अभ्यास करावा असे मत व्यक्त केले. यावेळी .कार्यक्रमाचे प्रास्तविकातून विष्णू थोरात म्हणाले संध्याने गावचे नाव उज्वल केले. विद्यार्थ्यांनी संध्याची प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले . कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.