शिक्षण संस्कृती

केज तालुक्यातील या मोठ्या गावातील जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात!

इमारत पाडली पण फुफाटा ( धूळ ) मुळे आरोग्य धोक्यात

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील आडस येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची संकट पाट सोडण्यास तयार नाही. आतापर्यंत जिर्ण इमारतीची भीती ती आंदोलनानंतर पाडण्यात आली. सुटकेचा निःश्वास सोडला पण इमारत पाडल्यानंतर धुळीचा त्रास सुरू झाला. यामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे या चिमुकल्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

आडस येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा, कन्या आणि उर्दू अशा तीन शाळा आहेत. येथे एक पत्र्याची जूनी पण खूप देखणी इमारत होती. वय झाल्यामुळे ती निर्जीव झाल्याने ती कधी पडेल याचा नेम नव्हता. लहान मुलं जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करत असे. मागील बाजू वापरात नसल्याने तिथे विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा रहावा वाढला होता. हे एक भीती त्यामुळे जूनी इमारत पाडण्याची मागणी पुढे आली. परंतु सरकारी काम अन् मनात येईस्तोवर थांब असं आहे. या मागणीसाठी तीन वेळा येथील सामाजिक कार्यकर्ती सविता आकुसकर यांनी आंदोलन केले. यावेळी कर्तव्यदक्ष जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता व केजचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्यामुळे ती जूनी इमारत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन जमिनदोस्त झाली. येथे खुलं मैदान झाले. हे पहाता पालक, शिक्षकांनी मोठी चिंता मिटल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु इमारत पाडल्यानंतर त्याचा चुना, जमीन उखडून गेल्यानं फुफाटा वाढलं आहे. थंडीचे दिवस असल्याने लहान मुलांच्या त्वचा कोरडी पडून खाजवत आहे. तसेच श्वास नाचे त्रास वाढण्याची भीतीही आहे. या चिमुकल्या विद्यार्थ्यांची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी इमारत पाडली तशी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत शाळेला निधी देते का?
प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाकडून स्वायत्त निधी येतो. त्यात स्थानिक पातळीवर शिक्षण, आरोग्य याचा वाटा असतो. अनेक गावांमध्ये या निधीतून शाळेला फर्निचर, पिण्याच्या पाण्यासाठी आर वो, पेव्हर ब्लॉक, रंगरंगोटी, टिव्ही, संगणक ( कम्प्युटर) , वीजपुरवठा व्हावं म्हणून सोलर उपकरणे खरेदी केली जातात. येथील जिल्हा परिषद शाळेत कोणतीही सुविधा नाही. मग आडस ग्रामपंचायतीला निधी येत नाही की, शाळेला दिला जात नाही? असा पालकांचा प्रश्न आहे.
फुफ्फुस, त्वचा,डोळ्यांचे आजार उद्भवू शकतात – डॉ. केकाण

धुळीमुळे लहान मुलांना फुफ्फुसाचे तसेच डोळ्यांचे व थंडीच्या दिवसात त्वचेला भेगा जाणं, त्यातून रक्त निघणं, त्वचा खाजवणे असे विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. ज्यांना दम्याचा अथवा त्वचेचा आजार आधीपासून आहे. त्यांना त्रास वाढू शकतो. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ. कृष्णा केकाण
( वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र,आडस )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »