केज तालुक्यातील मुख्याध्यापक आत्महत्या प्रकरणी २३ जणांवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने बीड येथे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोरील हॉटेल मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २३ आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये काही खाजगी सावकारांचा समावेश आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील सासुरा येथील रहिवासी भारत सर्जेराव पाळवदे ( वय ४० वर्ष ) असे मयत मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते नोकरी सोबत ऊसतोड मुकादम म्हणून काम करत होते. भारत पाळवदे यांनी एका साखर कारखान्याचे पैसे उचलून ते मजुरांना वाटप केले परंतु मजुर कामाला न आल्याने ते अडचणीत सापडले. कारखान्याचे पैसे परत करण्यासाठी त्यांनी काजगी सावकारांकडून पैसे घेतले होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. पैशांसाठी त्यांनी तगादा लावल्याने ते अस्वस्थ होते. याच विवंचनेतून आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल उचलले. बीड येथे जिल्हा परिषद इमारती समोरील एका चहाच्या हॉटेल मध्ये अडूला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मुख्याध्यापक पाळवदे यांच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोट सापडली त्यामध्ये २३ जणांची नावे आहेत. त्या अधारे व मयत भारत पाळवदे यांच्या पत्नी मंजुळा पाळवदे यांच्या फिर्यादीवरून २३ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केले आणि दिव्यांग अधिकार अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. तब्बल २३ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.