केज तालुक्यातील दोन दिवसांपासून बेपता असलेल्या व्यक्तीसोबत काय घडलं?

लोकगर्जना न्यूज
केज : केज तालुक्यातील एक व्यक्ती दोन दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबियाने शोध घेतला परंतु कुठेही मिळून आले नाही. आज ( दि. १० ) त्या व्यक्तीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ माजली आहे. या व्यक्तीसोबत नेमकं काय घडल? असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलीस तपासात निष्पन्न होईल.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कानडीमाळी ( ता. केज ) येथील गंगाराम लक्ष्मण खाडे ( वय ५५ वर्ष ) हे पुर्ण कुटुंब बाहेर गावी गेलेलं असल्याने घरी एकटेच होते. या दरम्यान ते दोन दिवसांपासून कोणाला दिसलेही नाही. कुटुंबिय घरी आले तरी ते न आल्याने मुलांनी शोधाशोध केली. परंतु ते कुठेही मिळून आले नाही. परंतु आज सकाळी गावा लगत असलेल्या एका विहिरीत गंगाराम खाडे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस तपासात ही घटना नेमकी कशी घडली हे निष्पन्न होईल.