केज तालुक्यातील जि.प., पं.स. गट व गणाचे आरक्षण कसे पडले?

लोकगर्जना न्यूज
जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाचे आज गुरुवारी ( दि. २८ ) काढण्यात आले. यामध्ये केज तालुक्यातील ७ गट व १४ गणाचे आरक्षण जाहीर झाले.यामुळे कहीं खुशी कहीं गम असे दिसतं आहे.
जिल्हा परिषदेचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. जिल्ह्यात एकूण ६९ गट आहेत. यामध्ये एस.सी. साठी ९ , ओबीसी १८, ओपन महिला २१, एसटी १ इतर ओपन असे आरक्षण सोडत झाली आहे. केज येथे तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत होती. यामध्ये एस.सी. २, ओबीसी ३, ४ ओपन महिला व इतर ओपन असे आरक्षण सोडत घोषित करण्यात आले. यामध्ये आडस व आसरडोह हे आडसकरांच्या हक्काचे दोन्ही जि.प. गट ओपन महिलेसाठी आरक्षित राहिले आहे. त्यामुळे ऋषिकेश आडसकर यांना आणखी ५ वर्ष वाट पहावी लागणार आहे. या दोन्ही गटातून घरातील महिला उमेदवार असणार आहेत. बजरंग सोनवणे यांच मात्र हक्काचं युसुफ वडगाव गट ओपन राहिला तर ते विद्यमान सदस्य आसलेला चिंचोली माळी ओपन महिलेसाठी आरक्षित राहिला. यावेळी ही दोघे सोनवणे पती-पत्नी चा मार्ग सुकर दिसत आहे. विडा ओपन महिलेसाठी आरक्षित राहिला असल्याने विद्यमान सदस्य विजयकांत मुंडे यांना आता महिलेला संधी द्यावी लागणार आहे. होळ हा नवीन गट आहे. एस.सी. साठी आरक्षित राहिल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. बनसारोळा गट ओपन राहिला आहे. त्यामुळे विद्यमान सदस्या डॉ. योगिनी थोरात यांना पुन्हा संधी मिळेल की, दुसऱ्या गटात जाणार ? बनसारोळा गट ओपन असल्याने ऋषिकेश आडसकर ही येथून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षण खालील प्रमाणे आहेत.
*जिल्हा परिषद गट
आडस = सर्वसाधारण महिला
चिंचोलीमाळी = सर्वसाधारण महिला
युसूफवडगांव = सर्वसाधारण
विडा = सर्वसाधारण महीला
होळ = अ.जा. सर्वसाधारण
नांदुरघाट = सर्वसाधारण
बनसारोळा = सर्वसाधारण
* पंचायत समिती गण
आडस = सर्वसाधारण
जिवाचीवाडी = सर्वसाधारण
चिंचोलीमाळी = सर्वसाधारण महिला
टाकळी = सर्वसाधारण महिला
युसूफवडगांव = सर्वसाधारण
सोनीजवळा = सर्वसाधारण
विडा = सर्वसाधारण
येवता = नामाप्र सर्वसाधारण
होळ = नामाप्र सर्वसाधारण
उमरी = अ.जा. महिला
नांदुरघाट = सर्वसाधारण
शिरुरघाट = नामाप्र सर्वसाधारण
बनसारोळा = सर्वसाधारण महिला
जवळबन = अ.जा. सर्वसाधारण