केज तालुक्यातील एका गावातील दोघांचा अपघात मृत्यू;गावावर शोककळा
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील माळेगाव येथील दोघांचा वेगवेगळ्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाबासाहेब रोहिदास राऊत वय ५५ वर्ष, वसंत अनंत लोकरे वय ४० वर्ष दोन्ही ( रा. माळेगाव ता. केज ) अशी मयतांची नावे आहेत. या दोघांचे वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला. बाबासाहेब राऊत यांचा हे ( दि. ३ ) डिसेंबर सकाळी उस्मानाबाद येथे पंचायत समिती कार्यालयाकडे जाताना पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली. यामध्ये बाबासाहेब राऊत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान सोमवारी ( दि. १२ ) सकाळी मृत्यू झाला. याच दिवशी वसंत लोकरे सोमवारी ( दि. १२ ) हे बाजार करुन गावाकडे दुचाकी क्रं. एम.एच. १४ एच एच ८३२९ वरुन येताना केज-कळंब रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात वसंत लोकरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसंत हे घरातील एकमेव कमवता व्यक्ती गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या दोन्ही घटनेमुळे माळेगाव येथे शोककळा पसरली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.