आपला जिल्हा

केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेवून अत्याचार:आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी व एक लाख दंड

अंबाजोगाई : केज तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस तोंड दाबून जबरदस्तीने पळवून नेऊन अत्याचार केले. याप्रकरणातील आरोपीस मा. न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला.

सन २०१७ मधील ही घटना असून, केज तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी मेहंदी क्लासेस साठी जात असताना आरोपी बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे, रा. वळसे वस्ती, ता. केज, जि. बीड याने पिडीतेचे तोंड दाबून जबरदस्तीने स्कॉर्पिओ जीपमध्ये टाकून पळवून नेऊन पुणे येथे ठेवले. या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेऊन अत्याचार केले. या आशयाच्या फिर्यादीवरून दि. २६/०४/२०१७ रोजी पो.स्टे . केज येथे गु.र.नं. १९९/२०१७, कलम – ३६३, ३७६ (i), ३४४, ३४ भा.द.वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करून सदर प्रकरणाचा तपास पो. निरीक्षक आर. जी. गाडेवाड यांनी करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश मा. श्री. डी. डी. खोचे साहेब यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष बा. लै. प्र. केस नं. २४/२०१७ प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. रामेश्वर एम. ढेले, मार्गदर्शन वरीष्ठ सरकारी वकील ॲड. अशोक व्ही कुलकर्णी यांनी केले आणि ॲड.नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »