केज तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा: या भुमिपुत्राने कांस्यपदक पटकावून उंचावली मान
लोकगर्जनान्यूज
केज : शिर्डी येथे आयोजित राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत केज तालुक्यातील भुमिपुत्राने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावून तालुक्याची मान उंचावली आहे. हा केज तालुक्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत कांस्यपदक विजेता नेमबाज प्रा. किशोर दळवे यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
शिर्डी ( जि. अहमदनगर ) येथे एअर गन असोसिएशन ऑफ इंडियन व स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ इंडियन यांच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावरील आठवी नेमबाजी स्पर्धा ( दि. ९ ) पार पडली. या स्पर्धेत चिंचोली माळीचे रहिवासी नायब तहसीलदार बाबुराव दळवी यांचे चिरंजीव प्रा. किशोर दळवी यांनी सहभाग घेतला. या नेमबाजी स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील खुल्या वयोगटातून नॅशनल रायफल व पिस्टलच्या स्लिंगशॉट चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत प्रतिस्पर्धकाला हरवून कांस्य पदक पटकावले आहे. ही कामगिरी तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून, यामुळे राज्यात केज तालुक्याची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या उल्लेखनीय कामगिरी बदल प्रा. किशोर दळवे यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.