राजकारण

केज कृषी उत्पन्न बाजार समिती आडसकर -मुंदडा गटाच्या ताब्यात

बजरंग सोनवणे गटाने 4 जागांवर विजय मिळविला

लोकगर्जनान्यूज

केज : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी पुर्ण झाली. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदार संघाच्या 11 ही जागांवर आडसकर -मुंदडा गटाचे उमेदवार विजयी झाले तर ग्रामपंचायत मतदारसंघातून 4 ही उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले. आडसकर -मुंदडा गटाचे तीन उमेदवार बिनविरोध आलें असल्याने 18 पैकी 14 जागा मिळवून आडसकर -मुंदडा गटाने बाजार समितीवर वर्चस्व कायम राखलं आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडीसाठी प्रथमच भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली असली तरी खरी लढत आडसकर -मुंदडा गट विरुद्ध बजरंग सोनवणे अशी झाली. या दोन्ही गटांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तसेच शिवसेनेने मतदारांचे अपहरण होत असल्याची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करुन खळबळ माजवून दिली. परंतु आडसकर -मुंदडा गटाने तीन सदस्य बिनविरोध निवडून आणून निवडणूक एकतर्फी होणार हे दाखवून दिले होते. यासाठी शुक्रवारी ( दि. 28 ) मतदान झाले. आज शनिवारी ( दि. 29 ) सकाळी शिक्षक पतपेढी येथे मतमोजणी करण्यात आली. एकूण 8 टेबलावर 24 कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केली. प्रथम ग्रामपंचायत मतदारसंघाची मतमोजणी करण्यात आली यामध्ये बजरंग सोनवणे यांच्या पॅनलने 4 पैकी 4 जागांवर विजय मिळविला. यानंतर 11 जागेसाठी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघाची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये सुरवाती पासून आडसकर -मुंदडा गटाने आघाडी घेत 11 ही जागांवर विजय मिळविला. एकूण 18 पैकी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघाचे 11 सदस्य आणि बिनविरोध 3 असे 14 जागांवर विजय मिळवून आडसकर -मुंदडा गटाने बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व कायम राखलं आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »