केज-अंबाजोगाई महामार्गावर मोठी दुर्घटना टळली
बसचा अपघात;जखमी प्रवाशांवर केज, अंबाजोगाईत उपचार सुरू
लोकगर्जनान्यूज
केज : राज्य परिवहन महामंडळाची अहमदपूर अगाराची बस असून, केज-अंबाजोगाई महामार्गावर चंदनसावरगाव जवळ रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. यामध्ये चालकासह अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते. यातील काही जखमींवर केज तर काहींवर अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अहमदपूर येथून औरंगाबादकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच.२० बी एल २५७२ चंदनसावरगाव जवळ आली असता. हॉटेल मोरया जवळ नेमकं काय घडलं? हे समजले नाही. अन् बस रस्ता सोडून खाली उतरून पलटी झाली. यामध्ये ५० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. यातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि काहींना स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर युसुफ वडगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात घडताच अनेकांनी मदत करीत १०८ आणि मिळेल त्या वाहनांनी उपचारासाठी हलविले.