केज-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी

लोकगर्जना न्यूज
केज : भरधाव कारने जोरात धडक दिल्याने दोघं जगीच ठार तर कार खड्ड्यात जाऊन पडल्याने आतील दोघे जखमी झाल्याची घटना केज-अंबाजोगाई महामार्गावर चंदनसावरगाव येथे मंगळवारी ( दि. १९ ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
ताहेर हुसेन आणि इस्माईल ( रा. उत्तर प्रदेश)असे दोघा मयताची नावे असून पुर्ण नाव समजु शकली नाहीत. हे दोघे ड्रायव्हर व क्लिनर आहेत. ते ट्रक घेऊन केजच्या दिशेने चालले होते. दरम्यान चंदनसावरगाव येथे त्यांनी चहा पिण्यासाठी ट्रक रस्त्याच्या खाली कडेला उभा केला. ड्रायव्हर व क्लिनर दोघं ही खाली उतरले आणि चहा पिण्या आधी चाकातील हवा तपासत असताना केज कडून भरधाव आलेल्या कारने दोघांनाही जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते दोघे जागीच ठार झाले. कार धडक बसताच रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पडली. यातील रवी दिलीप मुंडे आणि प्रदीप अर्जुन मुंडे हे जखमी झाले आहेत. हे दोघे धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे. केज-अंबाजोगाई महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी रस्त्यावर चार पदरी करुन दुभाजक टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.