केज, अंबाजोगाईसह ग्रामीण रस्ते गुळगुळीत झाल्याने आमदार मुंदडा यांचा विधासभेचा प्रवास सुकर
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : मागील पाच वर्षात आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून केज, अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते गुळगुळीत होऊ जनतेला दळणवळणाच सोय झाल्याने मतदारांची पहिली पसंती मुंदडा यांनाच असल्याने पुन्हा दुसऱ्या वेळी आमदार नमिता मुंदडा यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
केवळ पाच वर्ष मुंदडा कुटुंब सत्तेबाहेर असल्याने मतदारसंघातील विकास खुंटला होता. अनेक रस्ते खड्ड्यात गेले होते. जनतेला रस्त्यावरुन ठेचकाळत चालावं लागतं होत. हा अनुभव पहाता मुंदडा शिवाय कोणीही विकास करु शकत नाही हे ओळखून पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत आमदार नमिता मुंदडा यांना विधानसभेत पाठवून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हा विश्वास सार्थ ठरवित नमिता मुंदडा यांनी मतदारसंघात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. या माध्यामातून रस्त्यांची दर्जेदार कामे केली. अंबाजोगाई शहराचा विचार केला तर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवान बाबा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक, सावरकर चौक ते मंडीकडे जाणारा रस्ता यासह विविध रसत्यांसाठी शंभर कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करुन घेतला. यातून रस्ते पूर्ण केली. मोठ्या रस्त्यांमुळे अंबाजोगाईच्या वैभवात मोठी भर पडली आहे. तसेच अनेक वर्षांपासून केज करांना रस्त्याची प्ररतिक्षा होती. असे काही रस्ते करुन घेतल्याने दररोजची समस्या सुटली आहे. तसेच अनेक गावांना जोडणारे रस्ते खड्ड्यात हरवून गेली होती. रस्त्यात खेड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली होती. या खड्डेमय रस्त्यांमुळे ग्रामीण जनता त्रस्त झाली होती. परंतु यासाठी कोट्यावधीचा विकास निधी आणून अनेक रस्त्यांची दर्जेदार कामे करुन घेतली. यामुळे अनेक रस्ते गुळगुळीत झाल्याने जनतेचा प्रवास सुखाचा झाला आहे. यामुळे झालेली कामे मुंदडा यांच्यामुळे झाले असून पुढे ही तेच करु शकतात. यामुळे केज मतदारसंघातील मतदार आमदार नमिता मुंदडा यांच्याच पाठीशी उभे राहून मतदार रुपी आशीर्वाद देणार असल्याचे सांगत असल्याने आमदार नमिता मुंदडा यांचा विधानसभेचा प्रवास सुकर झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.