केजला मिळाले तहसीलदार; राकेश गिड्डे हे घेणार पदभार
लोकगर्जनान्यूज
केज : येथील तहसीलदारांचे पद रिक्त होते. यामुळे येथे तहसीलदार म्हणून कोण येणार? याकडे लक्ष लागले होते. आज महाराष्ट्र शासनाने तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश काढले असून यात राकेश आण्णासाहेब गिड्डे यांची केज तहसीलदारपदी नियुक्ती केली. तडफदार अधिकारी अशी त्यांची कारकिर्द आहे. तहसीलदार आले आता गटविकास अधिकारी कधी येणार याची केज तालुक्याला प्रतीक्षा आहे.
येथे जवळपास तीन महिन्यांपूर्वी एसीबीने कारवाई करत कोतवालास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेपासून तहसीलदार गायब असल्याने येथील पद रिक्त होते. तसेच येथील गटविकास अधिकारी पदही रिक्त असल्याने जनतेची कांबे खोळंबली असल्याने नागरिकांमध्ये मोठी ओरड झाली. आज राज्य शासनाने राज्यातील जवळपास ७० तहसीलदारांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. यामुळे केजसाठी राकेश आण्णासाहेब गिड्डे यांची नियुक्ती केली आहे. यामुळे तालुका महसूल प्रशासनाच्या कामात गती येईल असे चिन्ह आहेत. तसेच कर्मचारी, तलाठ्यांचे लाड बंद करण्याचे आवाहन गिड्डे यांच्या समोर रहाणार आहे. परंतु गिड्डे यांची कारकीर्द तशी खमक्या अधिकारी अशीच असून, ते येथे आल्यानंतर दिसून येईलच, तहसीलदार मिळाले पण गटविकास अधिकारी कधी मिळणार अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे.