क्राईम
केजला बीड रस्त्यावर दुचाकीचा अपघात

केज : येथे दि .३ जानेवारी रोजी रात्री १०:०० च्या दरम्यान बीड रस्त्यावर बीएसएनएल टॉवर जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार पांडुरंग सखाराम कदम (रा. कदमवाडी ) ता.केज जखमी झाले. त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस नाईक मंगेश भोले यांनी दिली.