केजमध्ये खळबळ! प्रयोगशाळा सहाय्यक ( Lab Assistant ) भाजलेल्या अवस्थेत रस्त्यावर दिसून आलं
लोकगर्जनान्यूज
केज : शहरातील शिक्षक कॉलनी जवळ कळंब ( जि. उस्मानाबाद ) येथील एका महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक ( Lab assistant ) असलेला इसम आज सोमवारी ( दि. २० ) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु या प्रकारामुळे केज शहरात खळबळ उडाली आहे. नेमका हा प्रकार आत्महत्येचा की, आणखी काही याबाबत चर्चा सुरू आहे.
श्याम काळे रा. दत्तनगर कळंब ( जि. उस्मानाबाद ) असे असून ते कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक ( Lab assistant ) आहेत. ते आज सोमवारी सकाळी केज शहरातील बीड रोडवर असलेल्या शिक्षक कॉलनी जवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आले. याबाबत माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु हा नेमका प्रकार काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी महिला नायब तहसीलदार यांनीही अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच शेतीच्या वादातून पिस्तुल लावल्याचे व एकावर ॲसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर हा प्रकार यामुळे केज शहरात खळबळ उडाली असून हा प्रकार नेमका काय? अशी चर्चा नागरिक करत आहेत.