क्राईम
केजमध्ये खळबळ! एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद
केज : येथे पहाटे ४:०० वाजण्याच्या सुमारास कानडी रोड वरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा दोघा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला.मात्र एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे अनर्थ टळला. दोघे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या घटनेने केजमध्ये खळबळ माजली आहे.
( दि. २२ ) आज मंगळवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास केज येथील कानडी रोडवरील असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम दोन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ते दोन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी पोलीस पथकाला पाचारण करून शोध लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.