केजचा लाचखोर तहसीलदार अन् कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
कोतवालाला २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
लोकगर्जनान्यूज
राशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना कोतवालास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. यामध्ये केजचा तहसील आरोपी असून तो मात्र फरार झाला. सदरील कारवाई शुक्रवारी ( दि. ३१ ) रात्री १० वाजता करण्यात आली. हा लाचेचा सापळा उस्मानाबाद एसीबी कार्यालयाने यशस्वी केला.
अभिजित जगताप असे लाचखोर तहसीलदाराचे नाव असून, मच्छिंद्र माने असे लाच स्वीकारणाऱ्या कोतवालाचे नाव आहे. एका राशन दुकानाच्या बाबतीत काहीतरी कारवाई प्रलंबित होती. ती कारवाई न करण्यासाठी ४० हजार लाचेची मागणी केली. तडजोडी नंतर २० हजार देण्याचे ठरले. तेच २० हजार एका धाब्यावर बसवून स्वीकारताना एसीबी पथकाने कोतवाल मच्छिंद्र माने यास रंगेहाथ पकडले. तर यामध्ये तहसीलदार आरोपी असून कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे समजताच तो फरार झाला आहे. या महिन्यातील लाचेच्या कारवाया पहाता जिल्ह्यात लाचखोरांचा भरणा झालेला दिसतो आहे. पहिल्याच कारवायाची शोधाशोध सुरू असूनही दुसऱ्या कारवायांचा धडका सुरू आहे. लाच घेण्यास कोणी घाबरतही नाही असे चित्र या यशस्वी सापळ्यावरुन दिसत आहे.