केजकरांनो उद्या थंड सावलीचे ठिकाण शोधा अन्यथा….?

लोकगर्जना न्यूज
केज येथील सबस्टेशनचे अंतर्गत दुरुस्ती काम असल्याने उद्या बुधवार ( दि.२७ ) दिवसभर वीजपुरवठा बंद रहाणार आहे. त्यामुळे केजकरांनो थंड सावलीचे ठिकाण शोधा अशी चर्चा सुरू झाली आहे.
उन्हाळा सुरू असून त्यात चार दिवस उष्णतेची लाट असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याप्रमाणे आजपासून उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे जाणवत असून जीवाची लाही लाही होत आहे. थोडा वेळही कुलर, पंखे बंद झाले तर माणसं गर्मी मुळे उकडून निघत आहेत. उद्या केज येथील सबस्टेशनचे अंतर्गत येणारे सर्व ११ फिडर बंद रहाणार आहेत. यासाठी इंटर्नल कामाचे कारण सांगितले जात आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ असा जवळपास पुर्ण दिवस वीजपुरवठा खंडित रहाणार आहे. त्यामुळे उष्णतेने काय हाल होतील! म्हणून उद्यासाठी थंड सावलीचे ठिकाण शोधा असा सल्ला केजकर एकमेकांना देत आहेत?
हाच ‘तो’ सोशल मीडियावरील मेसेज
Dt 27/04/2022 बुधवार रोजी केज नोडल सबस्टेशन अंतर्गत येणारे सर्व 11k फिडर सबस्टेशन च्या इंटर्नल कामासाठी सकाळी 09:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत बंद राहतील