केकाणवाडी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
चिमुकल्यांचे मान्यवरांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत
अंजनडोह(वार्ताहर)केज तालुक्यातील आडस केंद्राअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
तब्बल दोन वर्षां पासुन कोविड-19मुळे प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑनलाईन शिक्षणाचा ग्रामीण भागात प्रयोग यशस्वी झाला नाही. शासनाने हो-नाही म्हणत अखेर १डिसेंबर पासुन ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, विध्यार्थी आणि पालकांना शाळा सुरू होण्याची खुप उत्सुकता होती.
चिमुकल्यांचे स्वागत करण्या साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकाणवाडी येथे फुलांच्या माळांनी व रांगोळी काढून शाळेची सजावट करुन आनंददायी वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती जेणेकरून मुलांना शाळेत रमायला आवडेल.
कोविड-19 च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती, विध्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी मास्कचा वापर केलेला होता, मान्यवरांनी विदयार्थीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सरपंच सुरेश केकाण, उपसरपंच दत्ता मुंडे,शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष जनार्दन केकाण, मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन,शिक्षिका तरमिन बानो पठाण,अनिता गायकवाड, गोरख चाटे, महादेव चाटे,विष्णु केकाण, वर्षा चाटे,संजीवनी केका ण ईत्यादी सह मान्यवरांची उपस्थिती होती.