केकाणवाडीत प्रजासत्ताक दिनी शहीद सैनिकाच्या आई-वडिलांचा व सैनिकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या शाळेचा अनोखा उपक्रम
आडस : केज तालुक्यातील आडस केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकाणवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भारतीय सीमेवरील शहीद झालेल्या गोविंद चाटे यांचे आई-वडील रामदास चाटे व गवळण चाटे,गावातील सैनिक बाळासाहेब धोंडीराम केकाण,राजेभाऊ धोंडीराम केकाण, गोविंद कुंडलिक केकाण व माजी सैनिक बालासाहेब केकाण यांचे देशासाठी खुप मोठे योगदान आहे, त्यांची प्रेरणा विध्यार्थीना मिळावी म्हणून मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन व शिक्षिका तरमिन बानो पठाण,अनिता गायकवाड यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव केला.
जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांची भाषणे,राष्ट्रीय गीतावर अभिनय तर, विध्यार्थ्यांच्या लेझीम नर्त्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमा नंतर पदाधिकारी व गावकऱ्यांची शाळेत बैठक घेण्यात आली. बैठकीत शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या गरजा आम्हाला सांगा त्या आम्ही पूर्ण करू, केकाणवाडी हे छोटेसे जरी गाव असले तरी विध्यार्थ्यांच्या जिद्द आणि चिकाटी मुळे येथे सैनिक,पोलीस,शिक्षक,डॉक्टर व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या आहे आणि हे सातत्याने शाळेसाठी मदत करत आलेले आहेत.
या कार्यक्रमा साठी सरपंच बबिताताई केकाण,शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष जनार्धन केकाण, चेअरमन फुलचंद केकाण, छत्रभुज केकाण, मुकुंद केकाण, ग्रामसेवक मीना कांबळे,सामाजिक कार्यकर्ते गणेश केकाण, सुरेश केकाण, संजीवनी केकाण, वर्षा चाटे,विष्णु चाटे,महादेव केकाण, विष्णु केकाण, प्रकाश केकाण, अंगद केकाण, अंकुश केकाण मुरलीधर चाटे ईत्यादी पदाधिकारी पालक,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन यांनी विशद केले तर सूत्रसंचालन व आभार गणेश केकाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन,शिक्षिका तरमिन बानो पठाण,अनिता गायकवाड व गावातील तरुण वर्गानी परिश्रम घेतले.