शिक्षण संस्कृती
केंद्रेवाडीचा अविनाश बनला सीए
लोकगर्जना न्यूज
आडस : अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील अविनाश अरविंद केंद्रे याने सीए परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वडील अरविंद केंद्रे हे भारतीय सैन्य दलात देशसेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. या सैनिकाचा मुलगा असलेल्या अविनाशने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकौटंट ( सीए ) ऑफ इंडिया ( आयसीएआय ) च्या वतीने सन २०२२ मध्ये घेतलेल्या अंतिम परीक्षेचा नुकताच निकाल आलं. या परिक्षेत अविनाश केंद्रे यांनी प्राविण्याने यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्याचे गावाकऱ्यांमधून कौतुक करण्यात येत आहे. मित्र, नातेवाईक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.